ग्राम पंचायत नादरपूर आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........
  • समाज मंदिर क्रमांक दोनचे सुशोभीकरण.
  • गावासाठी जलशुद्धीकरण केंद्र व विष मुक्त शेती शिवार फेरी अभियान कार्यक्रम.
  • गाव ते फाटा येथे महाराष्ट्र ग्रा. रोजगार हमी योजना अंतर्गत वृक्षारोपणचे काम मंजूर.
  • गावातील पवित्र अशा स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात आले.
  • गावातील मंगल कार्यालय इमारतीची दुरुस्ती व सुशोभीकरण व ज्येष्ठ नागरिक कक्ष.
  • दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मंजूर करून टिकाऊ, मजबूत असे सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण.
  • पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध कामे.
  • केंद्र शासनाची ई-श्रम कार्ड योजना राबवली.
  • जास्तीत जास्त लोकांचे हेल्थ कार्ड विनाशुल्क बनविण्यात आले.
  • ड्रेनेजचे काम मंजूर.
  • छोट्या आणि मोठ्या कचऱ्या कुंड्या गावासाठी खरेदी केल्या.
  • ✓ विकास कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीस शासकीय योजनांचा लाभ न देणे.
  • ✓ सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या, भांडण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करणे. (पंचनामा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली.)
  • ✓ ग्रामपंचायत कराचा भरणा करणाऱ्या कुटुंबांना मोफत कचराकुंडीचे वाटप करणे.
  • ✓ एम.पी.एस.सी , यू.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरीत लागणाऱ्या व्यक्तीस गावाचे / कुटुंबाचे नाव उज्वल केल्याबद्दल प्रोत्साहनपर रुपये अकरा हजार रुपये बक्षीस वाटप करणे.
  • ✓ मजबूत सिमेंट बांध.
  • ✓ गावासाठी प्रशस्त व्यायाम शाळा.
  • ✓ तळागाळातील पानद रस्ते / शेत वस्तीवरील रस्ते.
  • ✓ माळरानावर जाण्यासाठी रस्ते.
  • ✓ संपूर्ण गावात ड्रेनेज लेन.
  • ✓ गावासाठी नवीन दुकान / गाळे उभारणे.
  • ✓ जिल्हा परिषद शाळा ते अंजना नदी संरक्षण भिंत.
  • ✓ श्री. बद्रीनाथ सोनवणे यांचे शेत ते पुलापर्यंत अंजना नदीलगत संरक्षण भिंत.
  • ✓ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणे.
  • ✓ गावासाठी नवीन स्मशानभूमी.
  • ✓ जनतेच्या सूचनेनुसार गरजेनुसार इतर कामे.